Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

संगणकाद्वारे धमक्या देणे, लपतछपत पाठलाग करणे आणि त्रास देणे

Kids using a laptop

 

क्रीडांगणावर ज्या गोष्टी घडू शकतात, त्या ऑनलाईनही घडू शकतात. संगणकाद्वारे धमक्या देणे म्हणजे इतर मुलांना ऑनलाईन क्रूरपणाची वागणूक देणे. यात खालील गोष्टी असू शकतात:

          दुसरे कोणी तरी असल्याचे भासवून दुखविणारे किंवा लज्जास्पद संदेश पाठविणे

          दुसर्याची गुपिते सांगणे

          अफवा पसरविणे

          धमक्या देणे

          वंश, धर्म, रुप, किंवा लैंगिक पसंतीवरुन केलेले द्वेषमूलक अपराध

ते धोकादायक का आहे?

संगणकावरुन धमक्या देण्यामुळे स्वत्वाची भावना कमी होणे, शाळा बुडविणे, नैराश्य किंवा आत्महत्याही घडू शकते. ऑनलाईन दिलेल्या धमक्या प्रत्यक्ष भेटीत दिलेल्या धमक्यांपेक्षा जास्त अपायकारक असू शकतात, कारण यात सुटकाच नसते. ते 24/7 घडू शकते. मुलांना मातापित्यांना सांगायला भीती वाटू शकते, कारण त्यांना त्यांच्या ऑनलाईन वापरावर बंधने घातलेली नको असतात. 

आपल्या मुलाला सुरक्षित कसे ठेवावे:

          आपल्या मुलाला गुगल करा (पूर्ण नाव, ईमेल पत्ता, स्क्रीन नेम शोधानेमक्या शोधासाठी अवतरण चिन्हे वापराउदा. “जेन स्मिथ).

          त्रास देण्याचे प्रकार हा फॉर्म वापरुन WiredSafety.org येथे कळवा.

संगणकावरुन धमक्या देण्याच्या बाबतीत धोकादायक वर्तन:

          इंटरनेटचे व्यसन: फार जास्त वेळ ऑनलाईन घालविणे

          व्यक्तिगत माहिती1 ऑनलाईन सांगणे

          आत्महत्याविषयक वेबसाइट्सना भेट देणे

          संगणकावर हिंसात्मक खेळ खेळणे

          लैंगिक कृतींसाठी इंटरनेट वापरणे

आपल्या मुलाला ऑफलाईन धमक्या येत असतील तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.

1. व्यक्तिगत माहिती

अशी माहिती की जी ऑनलाईन इतरांना देताना आपण व आपल्या मुलाने काळजी घेतली पाहिजे, जसे फोन किंवा सेल क्रमांक, ईमेल, स्क्रीन नेम, आडनाव, पत्ता व फोटो.

 

 

4
सरासरी 4 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation