Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

फक्त विश्वासार्ह संकेतस्थळांवरच खरेदी करा

Sponsored by Symantec

आपल्याला जवळजवळ काहीही ऑनलाईन विकत घेता येते. पण खरेदीसाठी प्रत्येक संकेतस्थळ सुरक्षित1 असेलच असे नाही. सुरक्षित संकेतस्थळांवर खरेदी करुन आपल्या क्रेडिट कार्डाचे ओळखीचे रक्षण करा.

संकेतस्थळ सुरक्षित आहे हे कसे ओळखावे:

          यूआरएल2 शेजारी किंवा खालच्या उजव्या कोपर्यात एक कुलुपाचे चिन्ह आहे का ते पहा.

 

          संकेतस्थळाचा पत्ता फक्त “http” च्या ऐवजी “https” ने सुरु होत असल्याची खात्री करा. “s” चा अर्थ सुरक्षित.

 

          पार्श्वभूमी तपासून पहा. प्रत्यक्ष पत्ता आहे का पहा (पी. . बॉक्स क्रमांक नाही), मेलने एक माहितीपत्रक पाठविण्याची विनंती करा, किंवा कॉल करुन कंपनीच्या प्रतिनिधीशी बोला.

 

          त्रयस्थ पक्षाने3 दिलेल्या मान्यतेचे चिन्ह शोधा. बेटर बिझिनेस ब्युरो ऑनलाईन किंवा ट्रस्ट- चा लोगो दिसतो का पहा. या कंपन्यांनी दिलेली मानके संकेतस्थळे पूर्ण करत असतील तरच ती ही चिन्हे वापरु शकतात. ही चिन्हे दिसली तर ती त्याच संकेतस्थळावर जातात ना हे पाहण्यासाठी त्यांवर क्लिक करा.

          गोपनीयताविषयक धोरण अटी शर्ती वाचा. खात्री करा, की या संकेतस्थळाकडे असे धोरण आहे की जे असे सांगते, की ते आपली व्यक्तिगत माहिती4 त्रयस्थ पक्षांना उघड करीत नाहीत.

          इतर वापरकर्त्यांना काय म्हणायचे आहे ते शोधून काढा. संकेतस्थळावर वापरकर्त्यांची मते नसतील, तर इपिनियन्स किंवा बिझरेट वर पहा.

 

          संकेतस्थळाच्या माल पाठविण्याच्या पद्धती धोरणांचा अभ्यास करा. संकेतस्थळ योग्य दर असलेले सुरक्षित मालवाहतुकदार वापरत असल्याची खात्री करा. आपल्याला आंतरराष्ट्रीय ठिकाणांहून माल पाठविणारी संकेतस्थळे टाळायची असू शकतात.

 

          स्वतःच्या अंतर्मनाच्या संदेशांवर विश्वास ठेवा. एखाद्या संकेतस्थळाबद्दल मनात शंका आली तर दुसर्या संकेतस्थळावर जाऊन खरेदी करा.  

  

एखाद्या संकेतस्थळाने आपल्याला खालील गोष्टी कधीही करायला सांगू नयेत:

 

          आपला सामाजिक सुरक्षा क्रमांक, बॅंक खाते क्रमांक किंवा आपल्या आईचे विवाहापूर्वीचे नाव मागणे.

          एखादे उत्पादन खरेदी करण्यासाठी अट म्हणून एखादे सर्वेक्षण पूर्ण करण्यास सांगणे.

 

असे विचारल्यास, त्वरित त्या संकेतस्थळाचा वापर बंद करा.

 

1.  सुरक्षित

जर एखादे संकेतस्थळ सुरक्षित असेल, तर त्याचा अर्थ आपण टाईप केलेली कोणतीही माहिती एखादा त्रयस्थ पक्ष किंवा हॅकर वाचू शकणार नाही. त्याचा अर्थ असाही आहे, की त्या संकेतस्थळाचे मालक जे आपण असल्याचे सांगतात, तेच आहेत. संकेतस्थळ सुरक्षित आहे हे आपल्याला त्याच्या वेबवरील पत्त्याच्या शेजारी किंवा उजव्या हाताच्या खालच्या कोपर्‍यात एक छोटीशी कुलुपाची खूण असते, त्यावरुन समजेल. वेबच्या पत्त्याची सुरुवातही ‘http’ ऐवजी ‘https’ ने होते. ‘s’ चा अर्थ सुरक्षित.

2.  यूआरएल

संकेतस्थळाचा पत्ता. (बहुधा असा दिसतो: http://thebeehive.org)

3.  त्रयस्थ पक्ष

संकेतस्थळाचे मालक/कर्मचारी सोडून इतर व्यक्ती. कधी कधी हा हॅकर असतो, जो गुप्त माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असतो.

4.  व्यक्तिगत माहिती

अशी माहिती की जी इतरांना ऑनलाईन सांगताना आपण व आपल्या मुलांनी काळजी घेतली पाहिजे, जसे फोन किंवा सेल क्रमांक, ईमेल, स्क्रीन नेम, आडनाव, पत्ता, व फोटो.

3.666665
सरासरी 3.7 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation