Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल
 
 
 
 
 
मुंबई बिहाइव्हमध्ये आपले स्वागत

भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची  जागतिक ओळख सर्व परिचित आहे.  मुंबईचा  सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक, राजकीय, औद्योगिक, मनोरंजन,इ. क्षेत्राच्या  जडणघडणीचा इतिहास वैभवसंपन्न आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर  मुंबईचे नाव प्रामुख्याने अधोरेखित केले जाते.

सर्वसामान्यांपासून ते श्रीमंत अशा सर्वांना आपलीशी वाटणाऱ्या मुंबईने  प्रत्येकाला स्वत:मध्ये सामावून घेतलेहे अनाकलनीय गूढ रहस्य अजूनपर्यंत कुणाला उमगले असेल, असे वाटत नाही. म्हणून  मुंबई बिहाइव्हसंकेतस्थळाच्या माध्यमातून व्यक्तीला दैनंदिन आयुष्यात महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींचा मागोवा घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.  हा मागोवा आरोग्य, शिक्षण, रोजगार, पैसा आणि शेती या परस्परपूरक विषयांमधून घेतला आहे.  अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजांसोबतच प्रत्येक व्यक्तीचा विकास आणि प्रगती होणे, हे ध्येय साध्य होणे तितकेच आवश्यक आहे.  मुंबई बिहाइव्ह अंतर्गत नामांकित सरकारी व खाजगी रुग्णालयेबचत गट, नोकरी आणि व्यवसायाच्या संधी, शासकीय आणि शैक्षणिक योजना, गुंतवणूक आणि बचतीची आवश्यकता, इत्यादींची माहिती  संबंधित संस्था आणि तज्ज्ञ व्यक्तींकडून घेतली  आहे. वैद्यकीय योजना, आय.टी.आय. व  महाविद्यालयातल्या कोर्सेसचे अभ्यासक्रम, बचत गटातील वेगवेगळे लघुउद्योग, आदी माहिती विविध क्षेत्रातील जाणकार व्यक्तींच्या मुलाखतीद्वारे घेण्यात आली आहे. मुलाखतींमध्ये डॉक्टर, शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे संचालक, उद्योजक आणि व्यावसायिक अशा अनेक तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे.       

मुंबई बिहाइव्हने आरोग्य, शिक्षण, रोजगार, पैसा आणि शेती या विषयांना केंद्रस्थानी ठेवले आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा फायदा होणे आणि उपलब्ध संसाधनांचा वापर करून आपले जीवनमान सुधारावे, हा दृष्टीकोन आहे !

In partnership with:

       Symantec

संपादकाची निवड

© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation